आपले स्वागत आहे!

 “विना सहकार नाही उद्धार” हा आधुनिक युगातील महामंत्र स्वातंत्र पूर्व काळात आत्मसात करून कै. द. सि. सामंत‚ कै. बा. म. साळवी ‚ कै. पु. ब. महाडिक‚ कै. सि. ता. पाटील‚ कै. रा. कृ. मुळ्ये‚ कै. वि. गो. खेर यांच्या कल्पनेने व समर्थ साथीने दि २४. ८. १९२८  रोजी रजिस्टर नंबर ६२१९ ने रत्नागिरी तालुक्यासाठी सहकारी तत्वावर रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर सन १९३३ पासून तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असे झाले. संस्थेच्या स्थापने  पासून फेब्रुवारी १९६६ पर्यंत संस्था 'सहकारी बँक' म्हणून काम पाहत होती. तद्नंतर संस्थेच्या सभासदांच्या सोयीचा विचार करून दि ०१.०३.१९६६ च्या सर्वसाधारण सभेत सदर बँकेचे रुपांतर सहकारी पतपेढी मध्ये करण्यात येवून संस्था 'रत्नागिरी जिल्हा प्राथमिक  शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित'  या नावाने पगारदार सेवकांची सहकारी  संस्था म्हणून काम पाहू लागली